img

Department Of Gastroenterology

Dr.Sandeep Kavlawkar – M.B.B.S

आता आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये पोटविकार आणि लिव्हर तज्ञ Dr.Sandeep Kavlawkar यांची सेवा सुरु केली आहे.
Dr.Sandeep Kavlawkar यांनी एम. बी.बी. एस. पदवी डी . वाय. पाटील कोल्हापूर येथून तर डी . एन . बी . ची पदवी शासकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथून घेतली. त्यांनी सुपर स्पेशालिटी (DNB Gastroenterology) हि पदवी चोईथराम हॉस्पिटल, इंदोर येथून घेतली. त्यांनी नंतर चोईथराम हॉस्पिटल, इंदोर येथे पोटविकार तज्ञ म्हणून काम केले.

खालील लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचार होतील.

१. आतड्याच्या विकाराची लक्षणे : अपचन , असिडिटी , पोट गच वाटणे , पोट दुखी , मळमळ , वारंवार ढेकर येणे , संडासमधून रक्तस्त्राव होणे , मूळव्याध , बद्धकोष्टता , जाठराला अल्सर होणे , मोठ्या आतड्याना जखमा होणे , जुलाब.

२. अन्ननलिकेच्या विकाराची लक्षणे : गिळण्यास त्रास होणे , छातीत जळजळ / दहा होणे, वारंवार पित्ताची कडवट गुळणी होणे , अन्ननलिकेचा मार्ग अरुंद असणे , रक्ताची उलटी होणे व इतर कारणामुळे अन्ननलिकेला इजा झाली असलेस.

३. यकृत (लिव्हर) विकाराची लक्षणे : कावीळ , अशक्तपणा , पायावर सूज , रक्ताची उलटी , काळ्या रंगाचे संडास होणे , अचानक बेशुद्धी या शिवाय दूषित पाण्यातून होणारी कावीळ , रक्तातून पसरणारी कावीळ, दारूमुळे होणारी कावीळ , लिव्हर सिरॉसिस , पोटामध्ये पाणी जमा होणे.

4.स्वादुपिंड व पित्ताशयाच्या विकाराची लक्षणे : वारंवार होणारी पोट दुखी , स्वादुपिंडाला खडे होणे , पित्ताशयाला सूज , पित्ताशयातील खडे पित्तनलिकेत अडकलेले खडे , स्वादुपिंड व पित्ताशयाचा कर्करोग.

उपलब्ध उपचार पद्धती :

१. गॅस्ट्रोस्कोपी : दुर्बिणीद्वारे अन्ननलिका , जठर व लहान आतडे तपासणी .
२. कोलोनोस्कोपी : दुर्बिणीद्वारे मोठ्या आतड्यांची तपासणी.
३. बायोप्सी : दुर्बिणीद्वारे संशयास्पद जागेचा तपासणीसाठी लहान तुकडा घेणे.
४. इंजेक्शन थेरपी : अन्न नलिकेतून होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी थेट दुर्बिणीद्वारे जठरामध्ये दिली जाणारी इंजेक्शन्स.
५. बॅड लॅगेशन : अन्न नलिकेतून होणारा रक्तस्त्राव रोखण्यासाठी दुर्बिणीद्वारे रक्त वाहिन्यांवर बॅड लावणे.
६. फॉरेन बॉडी रिमूव्हल : अनावधानाने गिळलेली वस्तू (अंगठी , नाणी , खिळे , बॅटरी सेल इ .) दुर्बिणीच्या साह्याने काढणे.
७. इसोफेजियल डायलेटेशन : अरुंद अन्ननलिकेचा मार्ग पूर्ववत करणे.
८. ईआरसिपी : पित्त नलिकेमध्ये अडकलेले खडे , अरुंद झालेली पित्तनलिका व पित्तनलिकेचा कर्करोग यामुळे झालेल्या कावीळसाठी नलिकेत स्टेट टाकणे.