img

Department of Onco Surgery

Dr. Pravinkumar Jadhav (MBBS.DNB)
Consulting OncoSurgeon
Dr. Vaibhav B. Amale (D.M. Medical Oncology)
Consulting Onco Physician

Cancer is emerging as a major public health problem all over the world

The department of Surgical Oncology offers both outpatient and inpatient services for screening , diagnosis and treatment of cancer patients . The department offers both minor and major operation theater services including endoscopy for various kinds of cancer.

Head & Neck Oncology
Breast Oncology
Gastrointestinal Oncology ( Gastro Esophageal , Hepato –Biliary, Colorectal cancers)
Thoracic Oncology
Genito-Urinary & Gynae Oncology
Bone & Soft Tissue Tumors

इन्श्युरन्स कंपनी आणि टी. पी. ए. संलग्नित कॅशलेस मेडिक्लेम
महात्मा फुले व प्रधानमंत्री योजनेअंतर्गत
कॅन्सर सर्जरी व किमोथेरपी मोफत

कॅन्सरबदल माहिती

कॅन्सर म्हणजे कर्करोग. यामध्ये होणारी गाठ उपचारास उशिर झाल्यास सर्व शरीरात पसरते. जर कॅन्सरची गाठ लवकर निदर्शनास अली व योग्य निदान व उपचार मिळाल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. कॅन्सर कोणत्याही वयोगटातील स्त्री अथवा पुरुष याना होऊ शकतो. वयोमान वाढेल तसे कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढत जाते. न दुखणारी गाठ शरीरात कोठेही असेल, जी वाढत असेल तर त्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

कॅन्सरवर मात करण्यासाठी आवश्यक – लवकर निदान व योग्य उपचार

१. स्तनांचा कॅन्सर –

– स्तनामध्ये न दुखणारी गाठ लागणे.
– गाठ २-३ आठवडे राहणे अथवा वाढत जाणे.
– स्थनातून रक्तमिश्रित स्त्राव येणे.
– २० वर्षापुढील कोणालाही स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो.
– पुरुषामध्येसुद्धा स्तनांचा कॅन्सर होतो.

२. तोंडाचा कॅन्सर –

– ओठ , जीभ , गालाचा आतील भाग , टाळू , हिरड्या यापैकी कोठेही न दुखणारी जखम अथवा गाठ .- मानेच्या वरच्या भागात गाठ.

३. घशाचा कॅन्सर –

– आवाजात बदल , घोगरेपणा
– नेहमी खोकला लागणे.
– घशामध्ये काही अडकल्यासारखे जाणवणे.

४. फुफुसांचा कॅन्सर –

– छातीमध्ये कोणत्याही बाजूला दुखणे.
– ४ आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला राहणे.
– औषध घेऊन खोकला न थांबणे.
– चालताना अथवा जिना चढताना दम लागणे.

५. पोटाचा कॅन्सर –

– भूक कमी होणे – खाल्यानंतर लगेच उलटी होणे.
– वजन कमी होणे – पोटाच्या ठिकाणी दुखणे.

६. अन्ननलिकेचा कॅन्सर –

– घट्ट पदार्थ (चपाती-भाकरी ) गिळण्यास त्रास होणे.
– जेवताना प्रत्येक घासासोबत पाणी प्यावे लागते.
– जेवताना छातीमध्ये काहीतरी अडकले आहे असे वाटणे.

७. आतड्यांचा कॅन्सर –

– संडास मधून रक्तस्त्राव होणे.
– पोटाच्या खालील भागात दुखणे.
– संडास काळ्या रंगाची होणे.
– ५० वर्षानंतर विशेतः पुरुषामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे.

८. किडनी कॅन्सर –

– लघवी लाल रंगाची होणे.
– पोटामध्ये गाठ लागणे.
– वजन कमी होणे.

९. प्रोस्टेट कॅन्सर –

– लगवी तटने किंवा लगवी करताना जोर लावावा लागणे.
– रात्री वारंवार लगवी करावी लागणे.

१०. गर्भाशय – गर्भमुखाचा कॅन्सर –

– ओटीपोटात वारंवार दुखणे.
– अंगावरून लाल किंवा पांढरे पाणी जाणे.
– मासिक पाळी थांबल्यानंतर सुद्धा रक्तस्त्राव होणे.

११. हाडांचा कॅन्सर –

– गुडगा किंवा कोणत्याही खंड्या जवळ सूज किंवा गाठ दिसणे.
– चालताना मांडीच्या हाडांमध्ये वेदना होणे.

१२. रक्ताचा कॅन्सर –

– वरचेवर ताप येणे वा रक्त कमी होणे.
– पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण खूप वाढणे किंवा कमी होणे.
– मान व शरीरात न दुखणारी गाठ असणे.
– पोटामध्ये वर उजव्या किंवा डाव्या बाजूला गाठ लागणे.
– अकारण अशक्तपणा जाणवणे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे